Kunbi Nondi : ‘नागरिकांनी १९६७ पूर्वीचे कुणबी नाेंदीचे पुरावे दाखल करा’

    162

    Kunbi Nondi : नगर : नगर जिल्ह्यात प्रशासनाने तब्बल ६४ लाख कागदपत्रे तपासली असून कुणबीच्या नाेंदी (Kunbi Nondi) शाेधण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम सुरू आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे (Government evidence) असणारे अभिलेख जिल्ह्याधिकारी (District Officer) कार्यालयात दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

    न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा २ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे.

    नगर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज आदी जुने अभिलेखे जिल्हा स्तरावरील स्थापित विशेष कक्षात मंगळवारी (ता. २१) ते शुक्रवारी (ता. २४) या कालावधीत जमा करता येतील. शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या समितीस मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळ झालेले करार निजामकालीन संस्थानिकांना दिलेली सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तीना मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. शासनाच्या ३ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आलेली आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती.

    त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात ‘स्वतंत्र कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here