Kukadi Project : घोड तसेच कुकडी प्रकल्पातून १ मार्चला आवर्तन

    141

    Kukadi Project : श्रीगोंदा : सध्याची दुष्काळी परिस्थिती (Drought conditions) पहाता धरणांमधील पाणी साठा आणि उन्हाळी पिकांचा विचार करून येत्या १ मार्च पासून घोड तसेच कुकडी प्रकल्पातून (Kukadi Project) आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या (Canal Advisory Committee) पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

    राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Kukadi Project)


    पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी (ता.२४) सकाळी घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, आमदार नीलेश लंके यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    आवर्तन सोडण्याबाबत मागण्या (Kukadi Project)


    घोड आणि कुकडी प्रकल्प हा श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. कुकडीचे उन्हाळा हंगाम आवर्तन तसेच घोड प्रकल्प उन्हाळी हंगाम आवर्तन सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार राम शिंदे यांनी सीना तलावात पाणी सोडण्याची मागणी केली. तर आमदार अतुल बेनके यांनी पाणीसाठा पाहता संपूर्ण आवर्तन ३८ दिवसांचे सोडण्याची मागणी केली असता आमदार रोहित पवार यांनी ४२ दिवसांची मागणी केली तर आमदार बबनराव पाचपुते यांनी ४० दिवस आवर्तन सोडण्याबाबत चर्चा करत आवर्तन ४० -४२ दिवसांपेक्षा कमी कालावधीचे केल्यास दिवसांचे केल्यास सर्व गावांना पाणी पोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले.


    या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावत दौंड इंदापूरच्या पिण्याच्या पाण्याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिण्याचा पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत आवर्तन चालू असताना पिकांच्या दृष्टीने एक दोन दिवस ऐनवेळी आवर्तन वाढविण्यात येईल, असे सांगितले. भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्ये भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.


    यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष भगवान पाचपुते, मिलिंद दरेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here