Kolhapur : शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

526

कोल्हापूर: आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटे बोलणार नाही, खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडूण येणार हे नक्की असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “मर्दाने मर्दासारखे लढलं पाहिजे, ते कसं लढतात हे कोल्हापूरकरांकडून शिकलं पाहिजे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. काल फडणवीस येऊन गेले. भाजपकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे काही सांगण्यासारखे नाही मग धार्मिक मुद्द्यांव पुढे केले जातात.”

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे. शिवसेना समोरुन वार करतो, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. आपण खोटं बोलण्यात कमी पडतो, त्याठिकाणी आपण कमी पडलो पाहिजेउद्धव ठाकरे म्हणाले की, “महापुरानंतर मी आणि फडणवीस एकाच ठिकाणी पाहणी केली, आम्ही काय केलं, काय नाही ते जनतेसमोर होऊ दे म्हणून गेलो. बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. 2014 साली समझोता होत असताना अचानक युती तोडली, 2019 साली युतीत असताना भाजपची 40 हजार मतं कुठं गेली? गेल्या वेळी तुम्ही छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केली होती की नाही सांगा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here