
नगर : काश्मीरला भारताचे स्वर्ग (Heaven of India) म्हणलं जाते. याच सुंदर काश्मीरचे वर्णन करणारे एक रॅप साँग (kashmir Rap Song) सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचे मुद्दे मांडत दोन रॅपर्सनी एक रॅप साँग गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होतो आहे. या गाण्यात असलेल्या दोन रॅपर्सनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे.
व्हायरल झालेल्या या गाण्यात नवं काश्मीर या थीमवर जोर देण्यात आला आहे. काश्मीरमध्ये सुधारणारं पर्यटन, संपत चाललेली दहशत, होणारा विकास या शब्दांवर भर देण्यात आला आहे. डिजिटल भारताच्या प्रगतीचाही उल्लेख या रॅप साँगमध्ये करण्यात आला असून जी २० परिषदांचाही या गाण्यात उल्लेख आहे.
विशेष बाब म्हणजे भारत सरकारच्या वेब पोर्टलनेही हे गाणं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. काश्मीरच्या युवकांना काय वाटतं हे सांगणारं गाणं असं कॅप्शन देऊन सरकारने हे गाणं पोस्ट केलं आहे. एवढंच नाही तर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी हे रॅप साँग शेअर केलं आहे.