Karjat Strike : दूध दर वाढीसाठी कर्जतमध्ये आमरण उपोषण

    144

    Strike : कर्जत : चारा टंचाई,(Fodder shortageपशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव यांच्यात कमालीची तफावत आहे. आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात (dairy business) मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे. वास्तविक पाहता खाजगी दूध संकलन करणारे प्रकल्प दूध उत्पादकांकडून कमी दरात दूध खरेदी करून आर्थिक पिळवणूक करीत असल्याने शासनाने यावर लक्ष द्यावे, तसेच दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० रुपयांचा भाव मिळावा, या मागणीसाठी अशोक खेडकर मित्रमंडळ यांच्यासह तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी कर्जत तहसील (Karjat Tehsil) कार्यालयासमोर आमरण उपोषण (Fasting to death) सुरू केले आहे.

    सध्या कर्जत तालुक्यात चारा टंचाई सदृश्य परिस्थिती उदभवली असून पशुपालक जनावरांच्या संगोपनासाठी मेटाकुटीला आला आहे. यांसह दिवसेंदिवस पशुखाद्य, त्यांना करण्यात येणारे औषधोपचार यांचे दर गगनाला भिडले आहे. मागील दीड महिन्यापासून १० रुपयांनी दुधाचे दर कमी झाले आहे. प्रत्यक्ष दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्यास मिळणारा भाव यामध्ये तफावत पडत असून शेतकरी राजा दुग्ध व्यवसाय तोट्यात करीत आहे. यामुळे त्यांच्या कर्जबाजारीपणा देखील वाढला आहे.

    खाजगी दूध संकलन करणारे प्रकल्प यांनी एकत्रित संघटन करून सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांकडून २५ रुपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर शासनाने त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. तसेच दुधाला प्रति लिटर ४० रुपये प्रमाणे दर मिळावा असा अध्यादेश काढून तो खाजगी दूध प्रकल्प आणि सहकारी दुग्ध संस्थाना बंधनकारक करावे. तसेच शासनाने प्रति लिटर ८ ते १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     यावेळी अशोक खेडकर, सुनील शेलार, नारायण जगताप, रघुआबा काळदाते, संजय तोरडमल, रावसाहेब खराडे, संदीप शेगडे, काकासाहेब धांडे आदी आंदोलनकर्त्यांनी पशुपालक आणि दूध उत्पादकांना येणाऱ्या अडचणी प्रशासना समोर मांडत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.या आमदार उपोषणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकिर, संचालक मंगेश पाटील, सरपंच शरद यादव, राजेंद्र तोरडमल, दादासाहेब खराडे, नवनाथ लष्कर, रामजी पाटील, बाळासाहेब निंबाळकर, रघुनाथ ढेरे, सर्जेराव कवडे, दीपक काकडे, अनिल गदादे, चंद्रशेखर पठाडे, संदेश देशमुख, सुभाष गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी सहभागी झाले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here