
नगर : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांना एक स्पेशल गिफ्ट देणार आहे. करणच्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘लव्ह स्टोरीयां’ (Love Storiyaa) ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
करणनं जोहरने शेअर केला ट्रेलर (Karan Johar)
‘लव्ह स्टोरीयां’ या सीरिजमधील सहा प्रेमकथा दाखवण्यात असतील. यामध्ये श्रीमंती-गरिबी, सीमा, जेंडर या सर्व गोष्टींना झुगारून प्रेम करणाऱ्यांच्या कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहेत.
या सीरिजमधील सहा कथा सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी यांनी या कथांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय या सर्वांनी मिळून वेब सीरीजची कहाणी देखील लिहिली आहेत. या वेब सीरीजचे निर्माते सोमेन मिश्रा आहेत.
या ट्रेलरला करणनं कॅप्शन दिलं, “जेव्हा प्रेम असते तेव्हा इतर काहीही महत्त्वाचे नसते! त्याचसाठी रिमाइंडर म्हणून वास्तविक जीवनातील प्रेमकथा आम्ही दाखवणार आहेत. सहा वास्तविक जीवनातील प्रेमकथा ज्या तुम्हाला प्रेमाच्या जादूची आणि शक्ती दाखवतील!” या वेब सीरीजच्या ट्रेलरमध्ये करण जोहर स्वतः दिसत आहे. या ट्रेलरमध्ये करण ‘प्रेमा’ची व्याख्या सांगताना दिसत आहे.
कधी रिलीज होणार ‘लव्ह स्टोरीयां’? (Karan Johar)
या वेब सीरीजमध्ये निशान एन पुथुसेरी, निकोलस जोनाथन खरमेनी, राजकी कार्की छेत्री, फरीदा साहा, सुभद्रा खापेर्डे, सुनीत कुमार साहा, राहुल बॅनर्जी,सोम्यजित घोष दस्तीदार, हुमायून खोरम, तीस्ता दास आणि दीपन चक्रवर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करण जोहरचा ‘लव्ह स्टोरीयां’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन-डेला अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर रिलीज होणार आहे.




