
नगर : २०२२ या वर्षात प्रदर्शित झालेला कन्नड भाषिक चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाने सगळ्यांनाच मोहित केले होते. या चित्रपटाची कथा, चित्रपटामधील सीन्स आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सगळ्याच गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. आता कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे. या प्रीक्वेलचं नाव ‘कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1’ (Kantara A Legend Chapter-1) असं आहे. या चित्रपटातील ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज झाला आहे.
ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर ‘कांतारा अ लेजेंड चॅप्टर-‘1 या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रक्ताने लालबुंद झालेला दिसक आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ आहे. या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. होंबळे फिल्म्स या युट्यूब चॅनलवर कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा टीझर देखील शेअर करण्यात आला आहे.
‘कांतारा’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपट फक्त साऊथ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, हिंदीमध्येही तो हिट ठरला. या चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. तर या चित्रपटात ऋषभ शेट्टीने शिवा ही भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मात्र ‘कांतारा अ लेजेंड चॅप्टर-१’ या मध्ये कोण भुमीका साकारणार हे समोर आलेलं नाही.




