
अकोले: महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वोच्च शिखर असणार्या कळसूबाई मंदिरावर उत्साही वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यानिमित्ताने आदिवासी युवकांनी (Tribal Youth) मंदिरावर आकर्षक वारली चित्रकला रेखाटली आहे. कळसूबाई (Kalsubai) शिखर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बारी गावात कोळी महादेव या आदिवासी जमातीची मुख्यत्वे वस्ती आहे आणि कळसूबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारी, जहागिरदारवाडी येथील युवकांनी तीन ते चार दिवसांच्या मेहनतीने सुंदर, रेखीव, आकर्षक अशी वारली चित्रकला मंदिरावर रेखाटली आहे.
यावेळी बिरसा ब्रिगेड अकोले तालुकाध्यक्ष पंढरीनाथ खाडे, बिरसा ब्रिगेड उपाध्यक्ष अंकुश करटुले, गुलाब करटुले, ज्ञानेश्वर भागडे, चित्रकार रमेश साबळे, धनेश साबळे, अनिल दराणे, भरत घारे, भारत खाडे, संतोष खाडे, केशव खाडे, राजू खाडे तसेच कळसूआई यात्रा समितीचे तुकाराम खाडे, रवींद्र खाडे, हिरामण भाऊ खाडे आदिंसह गावकर्यांनी आणि बिरसा ब्रिगेड शिलेदारांनी विशेष योगदानासाठी सहकार्य केले.


