Kalicharan : कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

403

ठाणे : ठाणे न्यायालयाने बाबा कालीचरण याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. कालीतरण बाबा(Kalicharan Baba)चा जामीन अर्ज आज दाखल करण्यात आल आहे. या जामीन अर्जावर सोमवारी ठाणे न्यायालयात निर्णय होणार आहे. ठाणे कोर्टने कालीचरण बाबाला 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी बाबा कालीचरणची रवानगी रायपूर जेलमध्ये केली आहे. महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरूवारी कालीचरण याला राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. (Kalicharan Baba remanded in judicial custody for 14 days by Thane court)

कालीचरण बाबाने कल्याण, पुण्यासह अन्य ठिकाणी जाहीर कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात 29 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार नौपाडा पोलिसांनी कालीचरण बाबाला अटक करुन न्यायालयात हजर केले. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कालीचरण याच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महात्मा गांधी विरोधात रायपूर येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजावर वर्धेत सुद्धा गुन्हा दाखल आहे. 12 जानेवारीला कालिचरणला पोलिसांनी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत कालिचरण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर वर्धा पोलिसांनी कालिचरण यांना रायपूर येथील सेंट्रल जेलमध्ये सुपूर्द केले. (Kalicharan Baba remanded in judicial custody for 14 days by Thane court)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here