Kadak Singh Movie : पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलं ‘कडक सिंह’चे पोस्टर

    115

    नगर : अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathiहे बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आता लवकरच पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंह’ (Kadak Singh) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

    पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘कडक सिंह’ चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. याला त्यांनी कॅप्शन दिलंय, ‘कहानियां कईं पर सच सिर्फ एक क्या कड़क सिंह झूठ के आगे की चीजों को देख पाएगा’ ? कडक सिंह चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी यांचे हावभाव गंभीर दिसत आहेत. चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर आता पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटात कोणती कथा दाखवण्यात येणार आहे? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

    पंकज त्रिपाठी यांचा कडक सिंह हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘कडक सिंह’ या चित्रपटामध्ये ए के श्रीवास्तव नाम ही भूमिका साकारणार आहेत. पंकज यांच्यासोबतच संजना सांघी, पार्वती थिरुवोथु  यांनी ‘कडक सिंग’ या चित्रपटामध्ये  काम केलं आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  सोहळ्यात पंकज त्रिपाठी  यांना ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here