Iran Oil Pipeline blast: इराणमध्ये मोठी दुर्घटना, तेलाच्या पाइपलाइनचा भीषण स्फोट

472

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरात भूकंपासारखा धक्क जाणवला. इराणमध्ये गेल्या 12 महिन्यांत आगी आणि स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

बुधवारी इराणच्या तेल पाइपलाइनचा स्फोट झाला. ही घटना देशाच्या दक्षिण भागात घडली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झाला, असे इराणी वृत्तपत्र तस्नीमने म्हचलं आहे. जुन्या पायाभूत सुविधांमुळे पाइपलाइनची झीज झाली होती आणि ती आज फुटली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरात भूकंपासारखा धक्क जाणवला. इराणमध्ये गेल्या 12 महिन्यांत आगी आणि स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here