IPL 2021 : जोस बटलरने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय ?

877

लंडन : इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जोस बटलरने (Jos Buttler) आता आयपीएलमध्ये (IPL2021) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने घेतलेल्या या निर्णयामुळे बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात बटलरची कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांच्याबरोबर बाचाबाची झाली होती. त्यानंतर तिसरी कसोटी सुरु होण्यापूर्वीच बटलरने हा निर्णय जाहीर केला आहे.

बटलर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. त्यामुळे हा राजस्थानच्या संघासाठी मोठा धक्का असेल. बटलर आयपीएलचा हा हंगाम का खेळणार नाही, याचे कारणही आता समोर आले आहे. बटलरची बायको दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. त्यामुळे बायको आणि मुलांची काळजी घेण्यासाठी त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरच्या जागी आता राजस्थानच्या संघात ग्लेन फिलीपचा समावेश करण्यात येणार आहे.

विराट कोहलीने लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या जोस बटलरला डिवचण्याचे काम केले. बटलर हा वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज फलंदाजी करतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कोहलीने यावेळी बटलरला डिवचण्याचा प्रयत्न केला. कोहली बटलरला यावेळी म्हणाला की, ” हे वनडे किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेट नाही.” कसोटी क्रिकेटमध्ये तुझा निभाव लागणार नाही, असे यावेळी कोहलीला त्याला सांगायचे होते. पण एवढे सांगतिल्यावर कोहलीकडून मोठी चुक घडली. बटलरचा एक सोपा झेल यावेळी कोहलीने सोडला. या जीवदानाचा फायदा यावेळी बटलरने चांगलाच उचलला.

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा जसप्रीत बुमरा हा मैदानात तग धरून होता, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी यावेळी बुमराबरोबर स्लेजिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला बुमरादेखील शांतच होता. पण काही वेळाने यष्टीरक्षक बटलर एक वाईट गोष्ट म्हणाला आणि त्यानंतर बुमराचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. बुमरा यावेळी बटलरला भिडल्याचेही पाहायला मिळाले. त्याचबरोबर ही गोष्ट बुमराने पंचांच्या कानावरही घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here