International : तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा कंदील

596

International Flights Resumed : परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे.  तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 27 मार्चपासून नियमित  आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा कंदील दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली असली तरी  कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

हवाई वाहतूक राज्यमंत्री  ज्योतीरादित्य शिंदे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, देशातील कोरोनाचा रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे त्यामुळे आम्ही 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय वाहतूक नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानंतर एअर बबल देखील बंद करण्यात येईल. 

या अगोदर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च 2022 पासून आंतरराष्ट्र विमानसेवेला बंदी घातली होती. त्याअगोदर 28 फेब्रुवारीला डीजीसीएने कमर्शिअल आंतरराष्ट्रीय विमानसेवेला पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here