गावरान मेवा | नगरचे किरण बेरड ठरले स्टार कथालेखक, वर्ल्ड बुक अॉफ रेकॉर्डने घेतली नोंद | उचापत्या
कोणतीही कथा किंवा इपिसोड करीत असताना त्यातून सामाजिक संदेश योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत कसा जाईल, याची ते नेहमी दक्षता घेतात. प्रत्येक वेळी सामाजिक संदेश दिल्याशिवाय त्यांचा कोणताही भाग पूर्ण होत नाही, हेच त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
चांगलं काम करीत राहिले की कोणाचे ना कोणाचे लक्ष जातेच. तुमच्या ध्यानीमनी नसतानाही तुमच्या कामाची दखल घेतली जातेच. चित्रपट कथालेखक बेरड यांच्यासोबत तेच झाले.
हेही वाचा – कोणापुढेही हात न पसरता मायलेकी जगताहेत स्वावलंबी
सध्या गावरान मेवा ही वेबसेरीज संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेली ही एकमेव वेबसेरीज ठरली. किरण बेरड हे त्या वेबसेरीजचे लेखक आहेत.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग क्षतिग्रस्त झाले आहे. या आजारापेक्षा लोकांच्या मनात भीतीच जास्त आहे. गैरसमजाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे आपल्या वेबसिरीजच्या माध्यमातून बेरड यांनी प्रबोधनाचे काम केले.
लॉकडाऊनमध्ये कोरोना व्हायरस काय आहे? आपण कशी काळजी घेतली पाहिजे? काय केलं पाहिजे? काय नाही केलं पाहिजे? यावर जनजागृती करणाऱ्या अनेक स्क्रिप्ट लिहून त्यावर सादरीकरण करून यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्या. त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले. त्यांची खूप चर्चा तर झालीच. परंतु लोकांनी ते कौतुक करीत शेअरही केले.
किरण बेरड हे गेल्या सात वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. त्यांचे दोन मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड पब्लिशिंग लिमिटेड युनायटेड किंगडम यांनी त्यांच्या स्टार 2020 डिरेक्टरी एडिशनमध्ये त्यांची नोंद केली आहे.
सध्या त्यांची नवी कोरी उचापत्या ही ग्रामीण बाज असलेली बेवसिरीज येत आहे. त्यांच्या वेबसिरीजमुळे अनेक ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे.