India Coronavirus Update : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,233 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 31 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 1876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या देशात केवळ 14 हजरा 704 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 4.24 कोटींवर पोहोचला आहे.
एकूण कोरोना रुग्ण : 4,30,23,215
देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 14,704
कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या : 4,24,87,410
एकूण मृत्यू : 5,21,101
लसीकरणाचा एकूण आकडा : 1,83,82,41,743
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, यादरम्यान, एकही मृत्यू झालेला नाही. या दरम्यान 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 960 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 1,057,915 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत आहे. आज मुंबईत 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नवे 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 300 झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. काल एकाही कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.






