ICC Hall of Fame: आयसीसीची मोठी घोषणा; हॉल ऑफ फेममध्ये ‘या’ भारतीय क्रिकेटरचा समावेश

    193

    नगर : वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ तुफान कामगिरी असतानाच क्रिकेट विश्वासाठी अजून एक चांगली बातमी समोर आली आहे. क्रिकेटमधील तीन महान खेळाडूंचा समावेश आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), माजी भारतीय महिला कसोटी कर्णधार डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंदा डी सिल्वा यांचा समावेश आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी तीन दिग्गजांची नावे आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत नवीन यादी जाहीर केली आहे. क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सलामीवीरांमध्ये सेहवागचे नाव घेतलं जात. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे रेकॉर्ड्स केले आहेत. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. सेहवागने कसोटीत दोनदा त्रिशतक ठोकले. आपल्या शानदार कारकिर्दीत त्याने २३ कसोटी शतके झळकावली. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे.

    आयसीसी हॉल ऑफ फेममधील दुसरे नाव म्हणजे डायना एडुलजी. डायना यांनी  जवळपास तीन दशके भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले. डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज म्हणून ५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १०९ विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत.  भारतीय रेल्वेचे क्रीडा धोरण तयार करण्यातही त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे.

    ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये सामील झालेला तिसरा खेळाडू म्हणजे अरविंदा डी सिल्वा, ज्याने १९९६ मध्ये श्रीलंकेला आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकण्यास महत्वाची भूमिका निभावली होती. श्रीलंकेचा हा फलंदाज फलंदाजीतील सातत्यासाठी ओळखला जात असे. १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २० कसोटी शतके झळकावली आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here