Hydrogen Car in India: एका रुपयात दोन किमी! गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार; एका टाकीत 650 किमीची रेंज

633

Hydrogen Car in India: एका रुपयात दोन किमी! गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार; एका टाकीत 650 किमीची रेंज

देशातील पहिली हायड्रोजन कार (hydrogen car) रस्त्यावर उतरली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लाँच करण्यात आली. या कारची टाकी एकदा फुल केली की ती 650 किमी अंतर कापणार आहे. 

टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी कार फ्यूअल सेल इलेक्ट्रिक व्हीकल्स (FCEV) नुसार ही कार पायलट प्रोजेक्ट म्हणून आणली आहे. ही कार लक्झरी वाहनांमध्ये असणार आहे. यामुळे जरी ती विक्रीसाठी उपलब्ध झाली तरी ती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार हे नक्की. 

नितिन गडकरी यांच्यासोबत केन्‍द्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, महेन्‍द्रनाथ पांडेय,आरके सिंह आणि टोयोटाचे अधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ही कार कमी खर्चात चालविता येणार आहे. भविष्यात जेव्हा आपल्या देशात हायड्रोजन स्टेशन उभे राहतील तेव्हा दोन किमीसाठी एक रुपयाचा खर्च येणार आहे. एक किलो हायड्रोजनची किंमत एक डॉलर म्हणजेच ७० रुपये आहे. या ७० रुपयात १२० किमीचे अंतर ही कार कापणार आहे. पायलट प्रोजेक्टनंतर या दिशेने वेगाने काम होईल. या कारची टाकी ६.२ किलो क्षमतेची आहे. यामुळे ही कार एकदा टाकी फुल केली की ६५० किमी धावेल. 

Toyota Kirloskar Motor ने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) च्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV Toyota Mirai चा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे, जो भारतीय रस्ते आणि हवामानात हायड्रोजनवर चालेल. टोयोटा मिराई असे त्याचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here