Housefull 5 : अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ ची तारीख आली समोर

    120

    नगर : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumarनेहमीच वेगवगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करता असतो. सध्या तो ‘हाऊसफुल ५’ (Housefull 5) या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘मिशन रानीगंज’ (Mission Raniganj) नंतर खिलाडी कुमार आता ‘हाऊसफुल ५’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मात्र हा सिनेमा २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    ‘हाऊसफुल ५’ हा सिनेमा २०२४ मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता अक्षय कुमारने या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे २०२५ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. ‘हाऊसफुल्ल ५’ या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे.

    अक्षय कुमारने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,”पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ६ जून २०२३ ला सिनेमागृहात भेटू”. ‘हाऊसफुल्ल ५’ या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

    ‘हाऊसफुल्ल’ हा सिनेमा २०१०मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. त्यानंतर २०१२ मध्ये ‘हाऊसफुल्ल २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. २०१६  मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’  तर २०१९  मध्ये ‘हाऊसफुल्ल ४’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता ‘हाऊसफुल्ल ५’ या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. ६ जून२०२५  रोजी हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here