HMPV व्हायरस: पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती

    169

    कोरोना महामारीनंतर, आता एक नवीन व्हायरस ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) जगभरात धोक्याचा इशारा देत आहे. या व्हायरसचे सर्वप्रथम उदाहरण चीनमधून समोर आले होते आणि लवकरच भारतातही त्याचे रुग्ण आढळले. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये याच्या बाधित रुग्णांची माहिती समोर आली. त्यानंतर नागपूरमधूनही दोन लहान मुलांमध्ये HMPV संक्रमण आढळल्याचे समोर आले आहे. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील प्रशासनाची अलर्ट मोडवर असून पुणे महापालिकेनेही त्यावर योग्य उपाययोजना सुरू केल्या आहेत.पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी, नीना बोराडे यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, HMPV व्हायरस नवीन नसून, त्याच्या उपचार पद्धतीसंबंधी सुस्पष्ट माहिती आहे.

    हा व्हायरस श्वसन संस्थेच्या वरच्या भागावर परिणाम करतो आणि लहान मुलं व वृद्ध व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळू शकते. हा व्हायरस फुफुसांपर्यंत जाऊ शकतो, परंतु सामान्यत: इतर वयोगटातील व्यक्तींमध्ये श्वसन संस्थेच्या वरच्या भागातच इन्फेक्शन होतो. बोराडे यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.तिच्या मते, कोरोनाप्रमाणे हा व्हायरस धोकादायक नाही. सर्दी, खोकला झाल्यावर जी साधी काळजी घेतली जाते, तीच काळजी यावेळी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जास्त न जाणे आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

    पुणे प्रशासनाची तयारी

    पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये HMPV संदर्भात 350 बेडची सुविधा तयार केली आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, सर्दी आणि खोकला असलेल्या व्यक्तींविषयी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतात याबद्दल मार्गदर्शन करत आहेत.

    नागरिकांनी घ्यावयाची काळजी:

    खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.

    साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत.

    ताप, खोकला आणि शिंका असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.

    भरपूर पाणी पिऊन, पौष्टिक आहार घ्या.

    वातावरणातील व्हेंटिलेशन योग्य असल्याची खात्री करा.

    काय करणे टाळावे:

    खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करू नका.

    टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचऱ्यात टाका.

    आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा, शक्य असल्यास त्यांना घरातच आयसोलेट करा.

    डोळे, नाक किंवा तोंडाला बारंबार स्पर्श करणे टाळा.

    या सर्व उपाययोजनांमुळे नागरिक सुरक्षित राहू शकतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here