Heramb Kulkarni : हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्लाप्रकरणी ६० आमदारांनी विधानसभेत उठवला आवाज; देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागले उत्तर

    139

    Heramb Kulkarni : नगर : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावरील हल्लाप्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. या प्रकरणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (Winter session) दाेन दिवसात ६० आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली. या प्रश्नाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. कुलकर्णी यांच्या हल्लाप्रकरणी पाचही आराेपींना अटक करण्यात आली असून कुलकर्णी यांना सशस्त्र पाेलीस संरक्षण (Police Protection) देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

    दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी नगर शहरामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन तेथील अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. यातील पाच आराेपींना अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आहे. इतर चार आराेपी न्यायालयीन काेठडीत आहे. हेरंब कुलकर्णी यांना पाेलीस संरक्षण देण्यात आले आहे. विद्यालय परिसरातही पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here