Gyanvapi Masjid Case Transfer : ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीशांसमोर होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

663

Supreme Court Hearing On Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाऐवजी जिल्हा कोर्टाकडे होणार आहे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी प्रकरणाची आज (शुक्रवारी) कोर्टात तिसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली

सर्वोच्चा न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी अनुभवी न्यायाधिशांनी सुनावणी करावी असे आम्हाला वाटते. सध्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांवर आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु जास्त अनुभवी न्यायाधिशांनी जर हे प्रकरण हाताळले तर याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. मंदिरात पुजा करण्याप्रकरणी देखील जिल्हा न्यायाधिशांनी लक्ष द्यावे. जिल्हा न्यायाधिश मशिद कमिटीची याचिकेवर देखील निर्णय घेतील की, त्यांचा दावा किती मजबूत आहे. तोपर्यंत शिवलिंग क्षेत्राची सुरक्षा आणि तसेच मुस्लिम बांधवांना नमाज पठण करताना कोणतीही अडचण येणार याची काळजी घ्यावी.

सुप्रिम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी सुरू करण्यास आठ आठवड्याचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या 17 मे च्या अंतरिम आदेशाचे पालन करावे. तसेच जोपर्यंत जिल्हा न्यायाधिश या प्रकरणी काही निर्णयापर्यंत येत नाही तोपर्यंत जिल्हा न्यायाधिशांनी वझूकरता पर्यायी व्यवस्था करावी. तसेच शिवलिंगाची देखील सुरक्षा करावी. शिवलिंगाची सुरक्षा आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालात काय? ज्ञानवापी मशिदी प्रकरणाच्या सर्वेक्षण अहवालानुसार, उत्तर ते पश्चिमच्या बाजूने चालत गेल्यास मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून आली. त्याशिवाय या ठिकाणी दिसून आलेल्या अवशेषांनुसार एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेष असल्याचं दिसून आलं असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशिद प्रकरणातील एक वकील आजारी असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली. तसेच, हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलानं सांगितलं की, वाराणसी कोर्ट 23 मे रोजी या प्रकरणावरील सुनावणी सुरू ठेवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here