Gopicahand Padalkar : रोहित पवार हा बिनडोक माणूस – गोपीचंद पडळकर

    124

    Gopicahand Padalkar: नगर : रोहित पवार (Rohit Pawar) हा बिनडोक माणूस आहे आणि त्यांना सल्ला देणारे बेअक्कल माणसे आहे. संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार त्याने संघर्ष बघितला कधी ? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopicahand Padalkar) रोहित पवारांना केला आहे. मुळातच त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अयशस्वी झाल्याने ते स्टंट करत आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांवर केली आहे.  

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेची (Yuva Sangharsh Yatra) समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी काल (ता.१२) लाठीमार केला.या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच घटनेवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांना लक्ष्य केले आहे.

    गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला राज्यात कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. कुठलाही विषय त्यांच्या हातात नाही. मग सरतेशेवटी करायचे काय म्हणून पोलिसांशी  त्यांनी वाद घातला. चर्चेत येण्यासाठी विधानभवनावर जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे पडळकर म्हणालेत. त्यांची संघर्ष यात्रा फेल झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी  विधानभवनावर जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रकाराकडे महाराष्ट्रातील माणसे गंभीरतेने बघत नाहीत, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी रोहित पवारांचा चांगलाच समाचार घेतला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here