Gold- Price: सोनं महागलं; सोन्याच्या भावात अफाट उडी ! १० ग्रॅमचा आजचा भाव

    87

    सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहत होते. पण सोन्याचे दर कमी कमी होण्याऐवजी वाढले आहेत. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायचा तुम्ही प्लान करत असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

    गुड़ रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,९१० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३२,६६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १९,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,२६,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

    आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२१,६०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १७,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१६,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

    तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,४३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं ब्रेदीसाठी आज तुम्हाला ९९,४९० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,९४,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हेच सोनं ९,९४,९०० रुपयांना विकले गेले होते. सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची खिशावर ताण येणार आहे.दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या द्रात देखील आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे.

    १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २०४ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,०४,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार हे खरं.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here