
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. भारतामध्ये सोन्याला फारच महत्त्व आहे. अनेकजण या धातूकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. तर काही लोक सोन्याची आभूषणं रून अंगावर परिधान करतात. म्हणूनच सोन्याचा भाव वधारला की त्याचा सामान्यांवर परिणाम होतो. तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. 6 डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याची चमक वाढलेली पाहायला मिळाली. तर चांदीचा भाव काहीसा कमी झाला. दरम्यान, सध्या सोन्याच्या भावात होत असलेला चढउतार आणि जागतिक घडामोडी लक्षात घेता, सोन्याचा भाव लवकरच दीड लाख रुपयांच्याही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
राजधानी दिल्लीमध्ये सोन्याने नवा रेकॉर्ड स्थापित केला. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,000 रुपयांच्याही पुढे गेला. तज्ज्ञांच्या मते अलिकडच्या दिवसात सोन्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता कमी आहे. सेन्को गोल्डचे एमडी आणि सीईओ सुवंकर सेन यांच्या मतानुसार जागतिक बाजारातील घडामोडी पुरक राहिल्या तर लवकरच सोन्याचा भाव थेट 1.50 लाख रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचू शकतो. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,19,260 प्रति दहा ग्रॅम झाली आहे. दुसरीकडे मुंबई, चेन्नई, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,19,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावत चढ-उतार पाहायला मिळत असले तरी एकंदरीत सोन्याची चकाकी आणखी वाढतानाच दिसत आहे. त्याला देशांतर्गत घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेले बदल कारणीभूत ठरत आहे. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह वलकरच व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांचा सोन्यासारख्या सुरक्षित् गुंतवणुकीकडे कल वाढतो आहे. त्यामुळेच आगामी काळात सोन्याचा भाव दीड लाखांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




