
Gold medal : नगर : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय (International) इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेत (Skating competition) भारत, केनिया, श्रीलंका, अबुधाबी, मालदीव अशा पाच देशांतून पाचशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारतासाठी (India) नगरच्या आठ वर्षीय कार्तिक नन्नवरेने तीन सुवर्णपदके (Gold medal) मिळवली आहेत.
कार्तिक हा नगरमधील टिम टॉपर्स स्केटिंग अॅकॅडमीचा खेळाडू आहे. त्याने ८ वर्षे वयोगटातील मुले क्वाॅड प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत तीन सुवर्णपदक मिळविली. तो मागील पाच वर्षांपासून स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुरुडगाव रस्ता येथील कै. पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंक येथे सराव करतो. तो एस.ए. नन्नवरे असोसिएटचे संचालक व इंडोरन्स असोसिएशन ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष संजय नन्नवरे मुलगा आहे. तो नवीन मराठी विश्रामबाग शाळेचा विद्यार्थी आहे. यापूर्वी देखील अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पदके मिळविली आहेत. त्याच्या सत्कार प्रसंगी माऊंट लिटरा झी स्कूलचे विशवस्त मिलिंद कानडे, प्रवीण गायकवाड, राहुल घोलप, रोहित कानडे, महेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते.