Fire : नगरमधील अंबर प्लाझा इमारतीला भीषण आग; जीवितहानी टळली

    141

    नगर : नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातील अंबर प्लाझा इमारतीला अचानक भीषण आग (Fire) लागली. घटनास्थळी अग्निशमन (fire fighting) दलाच्या दाेन गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी तसेच इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी घटनेची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ सूचना केल्या आहे.

    आग लागण्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पाेलीस अधीक्षक राकेश ओला हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जागेची पाहणी केली आहे. आगीच्या घटनेत सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे अंबर प्लाझा इमारतीत सर्वत्र धूर झाला होता.

    इमारतील लाेकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असं प्रत्यक्षदर्शनी सांगण्यात आले. प्रशासनाने लागलीच खबदारीच्या उपाययोजना राबवल्यामुळे आग आटाेक्यात आली असून नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here