Factionalism : राज्यातील गुटखाबंदी फसली; हेरंब कुलकर्णी यांचा सरकारवर गंभीर आराेप

    157

    Factionalism : नगर : राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. सरकारकडून (Govt) कुठलेही कठाेर पावले उचलले जात नाही. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. ही फार चिंतेची बाब असून सध्या राज्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी (Factionalism) ही फसलेली बंदी आहे, असा गंभीर आराेप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सरकारवर केला आहे.  

    दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी नगर शहरामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन तेथील अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे ३२ आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, या हल्ल्याच्या घटनेनंतरही नगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री सुरू असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले. 

    प्रशासकीय स्तरावर सर्वच अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. गुटखा बंदी आणि गुटख्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती व्याख्याने घेऊन तरुणांमध्ये या घातक पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासन स्तरावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यात पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. 

    गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबिचल झाली. मात्र, कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र, अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझ्यामागे सर्वजण ठामपणे उभा राहतील, असे संपूर्ण प्रशासनाने सांगितले होते. मात्र माझ्यावर प्रेम असले, तरी तरुण पिढी वाचवण्यासाठी हे सर्व विनाशकारी अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे. मात्र ते बंद होत नसल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here