Electric Vehicles : 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार ‘ही’ कंपनी, तुम्हीही चार्जिंग स्टेशन उघडून करू शकता चांगली कमाई

Electric Vehicles : 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार ‘ही’ कंपनी, तुम्हीही चार्जिंग स्टेशन उघडून करू शकता चांगली कमाई

मुंबई : देशाभरात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) विक्री वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. तसेच, सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्यासारख्या अनेक ऑफर देत आहे. ऑटो कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि नवीन EV मॉडेल सादर करत आहेत. अशा परिस्थितीत आता चार्जिंग स्टेशन उघडून कमाई करण्याची मोठी संधी आहे.

इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर  EVRE ने स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स ब्रँड पार्क प्लस (पार्क+) सोबत करार केला आहे जेणेकरून पुढील दोन वर्षात देशभरात 10,000 चार्जिंग स्टेशन उभारले जातील. या दीर्घकालीन भागीदारीमध्ये मालवाहतूक वाहने आणि इतर वाहनांसाठी स्मार्ट चार्जिंग आणि पार्किंग केंद्रं उभारण्यासाठी जागा सुरक्षित करण्यासाठी सहयोग समाविष्ट आहे.

EVRE ने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी कराराच्या अंतर्गत EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेची रचना, बांधकाम, स्थापना, ऑपरेशन आणि देखरेख करेल, तर पार्क+ रिअल इस्टेट पैलूची व्यवस्था आणि व्यवस्थापन करेल.

चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी येथून घ्या प्रशिक्षण 

देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी सरकारने एक नवीन योजना बनवली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) तरुणांना ही योजना पुढे नेण्याचं प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणादरम्यान, तुम्हाला चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच काम करण्याचे नवीन तंत्रही शिकवले जाईल.

प्रशिक्षणामध्ये तुम्हाला यंत्रणा, सौर शक्तीवर चालणारे इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, व्यवसाय, सौर पीव्ही चार्जिंग कनेक्टिव्हिटी लोड, वीज दर इत्यादींची माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणात तुम्हाला या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली जाईल. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडून चांगले पैसे कमवू शकता.

चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम जारी

NITI आयोगानं इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी धोरणं आणि निकष मांडण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांना एक नवीन हँडबुक जारी केलं आहे. हे हँडबुक इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी NITI आयोग, ऊर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे.

या दशकाच्या अखेरीस सर्व व्यावसायिक कारपैकी 70 टक्के, 30 टक्के खाजगी कार, 40 टक्के बस आणि 80 टक्के दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचं भारताचं लक्ष्य आहे.

कसे उघडायचे चार्जिंग स्टेशन

अनेक कंपन्या ईव्ही चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी फ्रँचायझी देतील. या कंपन्यांकडून फ्रँचायझी घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन उघडू शकता. एका अंदाजानुसार, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here