Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम

539

Eknath Shinde In Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. आज (सोमवारी) दुपारी साडेबारा वाजता ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते पैठणच्या (Paithan) सभेसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत.

  • 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने चिकलठाणा, औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
  • दुपारी 12.30 वा. चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि मोटारीने पैठणकडे प्रयाण.
  • दुपारी 1.40 वा. संत एकनाथ महाराज मंदिरास भेट आणि नाथ महाराजांचे दर्शन. (स्थळ : पैठण, जि. औरंगाबाद)
  • दुपारी 1.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.
  • दुपारी 2 वा. पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ : कावसानकर स्टेडियम, पैठण)
  • दुपारी 3.30 वा. पैठण येथून मोटारीने आपेगाव ता. पैठणकडे प्रयाण.
  • दुपारी 3.45 वा. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन (स्थळ: आपेगाव, ता.पैठण).
  • सायं 4.15 वा. आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण.
  • सायं 4.45 वा. श्री. संदिपान भुमरे, मंत्री, रोहयो व फलोत्पादन यांच्या निवासस्थानी आगमन आणि राखीव (स्थळ : पाचोड ता.पैठण)
  • सायं 5.15 वा. पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळ औरंगाबादकडे प्रयाण.
  • सायं 6 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन आणि शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त…राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि शिंदे गटातील तणावाचे वातावरण पाहता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद ते पैठण आणि पैठण ते पाचोड असा रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस पाईन्ट देण्यात आले आहे. तर जिल्हाभरातील ग्रामीण पोलिसांना बंदोबस्तसाठी पैठणमध्ये पाचारण करण्यात आले आहे. तर खुद्द पोलीस अधीक्षक कालपासून सभास्थळी असून, सुरक्षेचा आढावा घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here