e-EPIC डाऊनलोडसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): मतदार नोंदणी करताना एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना e-EPIC डाऊनलोड करताना येणाऱ्या भार तपासणीवर देखरेख करण्याकरिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
e-EPIC डाऊनलोड करण्यासाठी पात्र असलेल्या मतदारांची यादी संबंधित गावचे तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व गावातील महा ई सेवा केंद्र यांच्याकडे उपलब्ध आहेत. मतदारांनी त्यांच्याशी संपर्क साधून 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत nvsp.in या पोर्टलवरून e-EPIC डाऊनलोड करून घ्यावे. हा कार्यक्रम अत्यंत कालमर्यादीत असून याव्दारे e-EPIC डाऊनलोड करताना येणार भार तपासणी करण्यात येणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2021 पूर्वी आणि कार्यक्रमानंतर मतदार नोंदणी करताना एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेले मतदार e-EPIC डाऊनलोड करण्यास पात्र आहेत. या पात्र मतदारांनी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत nvsp.in या पोर्टलवरून e-EPIC डाऊनलोड करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त पात्र मतदारांनी 14 ऑगस्ट रोजी e-EPIC डाऊनलोड करण्याचे आवाहन शिरेाळ तहसिलदार डॉ. अर्पणा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.
0000000