Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2022 : अमरावतीत 131 किलोचा केक कापून महामानवाला अभिवादन! हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी

517

Dr.Babasaheb Ambedkar jayanti 2022: डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही. पण यावर्षी राज्य सरकारकडून निर्बंध हटविण्यात आल्याने राज्यात मध्यरात्रीपासूनच ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे. अमरावतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री चक्क 131 किलोचा केक कापून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही. पण यावर्षी निर्बंध हटल्याने यावर्षी रात्री 11 वाजेपासूनच हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अमरावती येथील इर्विन चौकात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गर्दी जमली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी 131 किलोचा केक कापण्यात आला. यावेळी रिपाईचे डॉ.राजेंद्र गवई यांनी हा केक कापला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी देखील करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले होते.

देशाच्या संविधानाच्या निर्मितीत आंबेडकरांची महत्त्वाची भूमिकाडॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here