
Do Aur Do Pyaar : नगर : दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण विद्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव आहे दो और दो प्यार. या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक (First Look) रिलीज करण्यात आला असून त्याची रिलीज डेटही समोर आली आहे.
दो और दो प्यार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक (Do Aur Do Pyaar)
विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना आणि सेंधील राममूर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दो और दो प्यार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. अॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि इलिपसिस एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहीले आहे, ‘मे लव्ह सरप्राइज यू, कन्फ्युज यू इन द सीझन’!
श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शन (Do Aur Do Pyaar)
दो और दो प्यार हा चित्रपट श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा त्यांचा डेब्यू चित्रपट आहे. हा चित्रपट ‘द लव्हर्स’ या परदेशी चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट २९ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





