
कर्जत: धनगर आरक्षणासाठी (Dhangar reservation) कर्जतमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस (Police) निरीक्षक घनश्याम बळप आणि निवासी नायब तहसीलदार (Tehsildar) महादेव कारंडे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या १३ दिवसांपासून जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असून शासन त्याची दखल घेत नाही. या पार्श्वभूमीवर आज (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाज बांधवांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, आमदार यांना पाठविण्यात धनगर समाजाचा मोठा वाटा असून आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही हे खूप खेदाची बाब आहे. धनगर आरक्षणास तत्काळ राज्य सरकारने मंजुरी द्यावी. याबाबत वटहुकूम काढत त्याची अंमलबजावणी करावी असे म्हंटले. आठवडे बाजार असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलनात धनगर समाजाचे नेते नवनाथ शिंदे, संतोष देवकाते, भानुदास हाके मेजर, हनुमान वंचित आघाडीचे चंद्रकांत नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.