Devendra Fadnavis: आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही; आक्रोश मोर्च्यातून फडणवीसांचा सरकारला इशारा

538

Jal Akrosh Morcha: जालना शहरातील पाणी प्रश्नावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फडणवीस यानी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार चाळलं कुठय, मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवत आहे. जोपर्यंत तुम्ही सामन्या माणसाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, जालन्याच्या पाण्यासाठी आम्ही 129 कोटी रुपये दिले,पण सरकार गेले आणि यांचे सरकार आले. त्यामुळे जिथे-जिथे जल आक्रोश आहे तिथे भारतीय जनता पार्टी आहे. जनतेच्या आक्रोशाची जे दखल घेत नाहीत त्या राज्यकर्त्यांना जनताखाली खेचल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवत नसाल तर तुम्हाला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मराठवाडा वाटर ग्रीडचा या सरकारने खून केला, दोन वर्षात या सरकारने एक रुपया देखील दिला नाही. कारण ही योजना झाली असती तर मराठवाड्याला एक दिवस देखील पाण्याचा खंड पडला नसता. तसेच ती योजना झाली असती तर आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, असेही फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here