मुंबई: मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निकाल लागला असला तरी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आर्यन खानला क्लीनचिटकॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.