Crop Insurance : जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राला पीक विमा कवच

    154

    Crop Insurance : नगर : यंदा रब्बी हंगामात आजअखेर ३ लाख ६२ हजार ७४० हेक्टर क्षेत्राचा शेतकर्‍यांनी (farmer) एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) उतरवला आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ९४ हजार ९२४ शेतकर्‍यांनी सरकारच्या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. यात ६ लाख ४४ हजार ४४० कर्जदार, तर ११ हजार ५१४ बिगर कर्जदार अशा प्रकारे सुमारे ६ लाख ५० हजार शेतकर्‍यांचे विमा अर्ज आले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आली.

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना २ लाख ९४ हजार शेतकर्‍यांनी विमा संरक्षण घेतले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी भूईमूग या पिकांची ३ लाख ६२ हजार ७४० हेक्टवरील पिकाचा विमा उतरवलेला आहे. शेतकर्‍यांनी काढलेल्या विम्याची संरक्षित रक्कम ही २ हजार ५८ कोटीची आहे.

    तालुकानिहाय पीक विमा काढलेल्या पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

    नगर- २२ हजार ३०९.
    पारनेर- ४१ हजार १५५.
    नेवासे – ३४ हजार ९८९.
    कोपरगाव- २९ हजार २२७.
    कर्जत- २७ हजार ४९०.
    जामखेड- ३६ हजार ८८६.
    अकोले ९ हजार १३१.
    पाथर्डी- २३ हजार ६२७.
    राहाता- २७ हजार ७३६.
    राहुरी- १९ हजार ३०१.
    संगमनेर- ३२ हजार ७०४.
    शेवगाव- २३ हजार ४३०.
    श्रीगोंदे- १७ हजार ४८१.
    श्रीरामपूर १७ हजार २७४

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here