सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत इतकी वाढ
दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता
आतापर्यंत ४२ हजार ८८० रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६४ टक्के
आज ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर (दि ६ ऑक्टोबर २०२०) : जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५,
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७१ आणि
अँटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहाता ०१, राहुरी ०५, संगमनेर ०५, श्रीगोंदा ०४, मिलिटरी हॉस्पिटल २० अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २०, अकोले ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता १५, राहुरी १३, संगमनेर ०१, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३०६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १५, अकोले १३, जामखेड ३६, कर्जत २२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०९, पारनेर १४, पाथर्डी ३१, राहाता ५०, राहुरी ०९, संगमनेर २९, शेवगाव २५, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रा. ०१, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:४२८८०
उपचार सुरू असलेले रूग्ण:३६८८
मृत्यू:७४१
एकूण रूग्ण संख्या:४७३०९
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
*माझेकुटुंबमाझी_जबाबदारी