गेल्या काही काळापासून जगभरातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं. परंतु अशातच आता चीनमधून पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दक्षिण चीनच्या हब शेनजेनमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या शहरातील १ कोटी ७० लाख लोकांना त्यांच्या घरात बंद राहावं लागणार आहे. स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतला असून आता जिल्ह्यात एका दिवसात ६६ संसर्गग्रस्तांची नोंद झाली आहे.
चीनच्या जिलिन प्रांताची राजधानी चांगचून येथे शुक्रवारी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरातील ९० लाख लोकांना आपात्कालिन अलर्ट जारी केल्यानंतर आपल्या घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.
तर दुसरीकडे शांडोंग प्रांताच्या युचेंगमध्येही लॉकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. या ठिकाणची लोकसंख्या जवळपास पाच लाख इतकी आहे. चीनमधील तीन शहरांतील जवळपास पावणेतीन कोटी लोक आपल्या घरात बंद झाले आहेत.
शेनजेनमध्ये चीनच्या दोन प्रमुख कंपन्या हुआवे आणि टेनसेंटची मुख्य कार्यालये आहेत. हे शहर हाँगकाँगच्या सीमेलगत आहे. या ठिकाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित सापडले होते.
हाँगकाँगमध्येही कोरोनाची स्थिती सध्या बिकट होत आहे. या ठिकाणी २७६४७ नव्या बाधितांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे आणखी ८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. आतापर्यंत या ठिकाणी ३७२९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
चीनमध्ये शनिवारी गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जवळपास २ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर यापैकी २० बाधित बीजिंगमधील आहे.
या दरम्यान शांघायमधील शाळा आणि पार्क बंद ठेवण्यात आले होतं. तर दुसरीकडे बीजिंगमधील रहिवासी क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. आपल्या घरातून कोणीही बाहेर पडू नये, तसंच गरज नसेल तर शहरातूही बाहेर जाऊ नये, असे निर्देश नागरिकांना देण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे कोरोनामुळे एका दिवसात ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हाँगकाँगमध्ये ३७२९ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे या ठिकाणी एका दिवसात २७,६४७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. अ