Coronavirus Guidelines: परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा; कोरोनाबाबत केंद्राची नवी नियमावली

327

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत आदेश काढला. यात परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना नव्या नियमावलीमुळे दिलासा मिळणार आहे. मंत्रालयानं जोखीम असलेल्या देशांची श्रेणी रद्द केली आहे. त्याशिवाय ७ दिवसांच्या सक्तीच्या होम क्वारंटाइनमधूनही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नवी नियमावली १४ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार, आता जोखीम श्रेणीतील देश आणि अन्य देश यात कुठलाही फरक नसणार आहे. त्यासोबतच आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्यांसाठी ७ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्येही बदल केला आहे. या प्रवाशांना १४ दिवस स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

नव्या नियमावलीनुसार, जो कुणाला भारतात यायचं असेल त्यांनी आधी सुविधा पोर्टलवर एक माहिती पत्रिका भरुन द्यायची आहे. त्यात मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यायची आहे. खालील दिलेल्या पोर्टलवर क्लिक करुन (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) तुम्ही माहिती भरु शकता.

परदेशातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह अथवा पूर्ण लसीकरण झालेले प्रमाणपत्र एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावं लागेलसंबंधित एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीने प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी देशातील कोरोना प्रोटोकॉल माहिती आणि संबंधित नियमांबाबत माहिती द्यावी.

विमानात केवळ याच प्रवाशांना प्रवास करुन द्यावा जे एसिम्टोमॅटिक असतील. त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू एप डाऊनलोड करावा लागेलविमान पायलट आणि क्रू मेंबर्स कोविड नियमांचे पालन करतील. जर कुठल्याही प्रवाशाला कोविड लक्षणं आढळली तर त्याबाबत योग्य ती तक्रार करुन प्रोटोकॉलनुसार संबंधित प्रवाशाला आयसोलेट करावं लागेल.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६७ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here