Coronavirus Cases Today : कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच 10 हजारांहून कमी रुग्ण, 119 जणांचा मृत्यू

439

Coronavirus Cases Today in India : भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक आता जवळपास संपला आहे. दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशात 10 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 8,013 नवीन रुग्ण आढळले असून 119 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 16,765 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, म्हणजेच 8871 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी 9,195 कोरोना रुग्णांची नोंद झाली होते.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी 29 लाख 24 हजार 130 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 13 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 23 लाख लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 1 लाख आहे. एकूण 1 लाख 2 हजार 601 जणांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना लसीचे 177 कोटी 50 लाख 86 हजार डोस देण्यात आलेकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 27 फेब्रुवारी 2022 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 177 कोटी 50 लाख 86 हजार डोस देण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 77 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. कालच्य दिवशी सुमारे 7 लाख कोरोना नमुने करण्यात आले.

देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण 98.56 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 0.24 टक्के आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत आता जगात 51 व्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here