Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

472

पुणे: Corona Update- पुणे शहरात कोरोनाचे (covid 19 cases in pune city) रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहे. आज शहरात कोरोनाचे ५ हजार ४१० रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत आज शहरात नवीन रुग्णांची वाढ मोठी आहे(new corona cases in pune). रविवारी शहरात ३ हजारांच्या जवळपास रुग्ण वाढले होते. सोमवारी हा आकडा पाच हजारांच्या पुढे गेल्याने चिंता वाढली आहे.

सध्या शहरात ३३ हजार ५२८ रुग्ण सक्रिय आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. आज शहरात तब्बल ८ हजार २१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पुणे शहरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाच्या १२ हजार ६७२ कोरोना चाचण्या झाल्या. त्यामध्ये  ५ हजार ४१० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here