Congress President: राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यायला तयार आहेत का? असा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून विचारला जात आहे. याचेच उत्तर आता मिळाले आहे. एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरमधील चिंतन शिबिरात काही नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली, तेव्हा राहुल म्हणाले की, पक्ष जे म्हणेल ते मी करेन.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली नसली, तरी चिंतन शिबिरात समितीच्या बैठकीत राहुल गांधींच्या वक्तव्यावरूनच राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
राहुल गांधी निवडणूक लढवणार?काँग्रेसच्या अध्यक्ष आणि संघटनेच्या निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहेत आणि राहुल गांधी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पक्ष जे म्हणेल ते मी करेन, असे राहुल गांधींच्या चिंतन शिबिरात म्हटल्याने कदाचित आता त्यांनी याबाबत मनसुबे तयार केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज चिंतन शिबिराचा शेवटचा दिवसउदयपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या या चिंतन शिबिरातील संवाद सत्र रविवारी संपणार आहे. चर्चेचा निष्कर्ष जाहीरनाम्याच्या स्वरूपात नोंदवला जाईल. रविवारी संध्याकाळी येथे होणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) बैठकीत मसुद्याच्या घोषणेवर चर्चा केली जाईल. दरम्यान, याच मुद्द्यावर एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत की, 24 वर्षांपासून पक्षात निवडणूक नाही, ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगली बाब नसल्याचे ते म्हणाले आहेत.




