Congress : नगर जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

    140

    संगमनेर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Congress) जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. 

    या कार्यकारणीमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी सचिन गुजर, उपाध्यक्षपदी प्रशांत दरेकर, ॲड. कैलास शेवाळे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रा. हिरालाल पगडाल, मधुकरराव नवले, अजय फटांगरे,अंकुश कानडे, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे, बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी,बाबासाहेब गुंजाळ, लता डांगे ,सचिन गायकवाड, रोहिदास चव्हाण यांचा समावेश आहे.

    तर सरचिटणीसपदी ॲड. माणिकराव मोरे, ज्ञानेश्वर वाफारे, योगेश भोईटे, रवींद्र गायकवाड, सतीश मखरे, अभिजीत लुणिया, अशोक कानडे, विक्रांत दंडवते, श्रीकांत मापारी,  ज्ञानेश्वर झडे, उत्तम डाके, सतीश बोर्डे, मुजफ्फर शेख, अशोक हजारे, विश्वासराव मुर्तडक, डॉ. दिलीप भोस, भारत भवर, कैलास पठारे, सुनील शिंदे, कुंडल राळेभात, जयंत वाघ, महादेव कोकाटे, ॲड. त्रिंबक गडाख,आरिफ तांबोळी, सतीश भांगरे, फैयाज तांबोळी, सुषमा भालेराव, प्रतापराव देवरे, आप्पासाहेब डावखर, अशोक वाळुंज, भीमराव नलगे, दादा पाटील आढाव, पंढरीनाथ पवार, भानुदास बोराटे, रंजन जाधव, महेंद्र संत, सुमित शेळके यांचा समावेश आहे. तर चिटणीसपदी बाबासाहेब कोळसे, जालिंदर काटे, शामराव वागस्कर, विष्णुपंत खडागळे, मुबारक बादशहा यांच्यासह ४६ जणांचा समावेश आहे. 

    कार्यकारी सदस्यांमध्ये नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ४२ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कायम निमंत्रित सदस्य मधून जिल्हा काँग्रेस कमिटीचे आजी माजी अध्यक्ष, पक्षाचे आजी-माजी मंत्री, लोकसभा व विधानसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाचे उमेदवार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष यांचा समावेश आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here