
संगमनेर: काँग्रेस (Congress) पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. या पक्षाने देशाच्या हितकारक अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहे. त्यागाची व बलिदानाची परंपरा असलेल्या या पक्षाने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. जिल्हा काँग्रेसच्या डॉक्टर (Doctor) सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या, यावेळी आमदार थोरात बोलत होते.
यावेळी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोज राका, राजेंद्र पाटील नागवडे, ज्ञानदेव वाफारे, डॉ. दादासाहेब थोरात, दादा घुले, सुरेश झावरे, मिलिंद कानवडे, डॉ. तुषार दिघे, बाळासाहेब आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाशिक जिल्हा डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी नीलम पाटणी, संगमनेर तालुका अध्यक्षपदी डॉ.सचिन वाळे, राहुरी तालुका अध्यक्षपदी डॉ. सचिन चौधरी, अकोले तालुका अध्यक्षपदी डॉ. अरुण बोबले, कोपरगाव तालुका अध्यक्षपदी डॉ.सुजित तांबे, नेवासा तालुका अध्यक्षपदी डॉ. सोपान कर्डिले, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी डॉ.जमशेद शेख, पारनेर तालुका अध्यक्षपदी डॉ. गुलाब शेख तर श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी डॉ. सचिन जाधव यांची निवड झाली असून जिल्हा सेक्रेटरी पदी जयसिंग कानवडे व तय्यब शेख यांची निवड झाली आहे. यावेळी मिलिंद कानवडे, ज्ञानदेव वाफारे ,दादासाहेब थोरात, डॉ. राका यांनी मनोगत व्यक्त केले.