Congress : काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची मागवली नावे; मित्रपक्ष बुचकळ्यात

    159

    Congress : नगर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागा वाटप अद्यापही ठरलेले नसताना, राज्यातील प्रदेश काँग्रेसने (Congress) राज्यातील सर्व लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत मागवून मित्रपक्षांना बुचकळ्यात टाकले आहे.

     कोणत्याही पक्षाने अद्याप जागा निश्चित केलेल्या नाहीत. राज्यातील ४८ जागांचा विचार केल्यास तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याचे चिन्हे आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नुकतीच दिल्लीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. दिल्लीतील बैठक आटोपताच सर्व जिल्हाध्यक्षांकडून राज्यातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत पाठवण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here