CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा, कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष

328

मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्यानं दिलेलं आव्हान….. या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेत घेतील असे संकेत शिवसेनेनं आतापर्यंत जारी केलेल्या जाहिरातींमधून मिळाले आहेत. याशिवाय ओवैशींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतल्या बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं आज सभा होणार आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय. त्यामुळे या सभेत मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे.

  • उद्धव ठाकरेंच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील?
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • नवनीत राणा आणि रवी राणा
  • केंद्र सरकार
  • महागाई
  • केंद्रीय यंत्रणा
  • आगामी निवडणुका

मुंबईतल्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. कोरोनानंतर प्रथमच मुंबईच्या बाहेर जात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. ते महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार आहेत. यात ते शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here