
नगर : देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. तसेच महाराष्ट्रातही पुन्हा डबल इंजिन (Double Engine Government) सरकार सत्तेत येईल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते सोलापुरात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात (Solapur) नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. ३५० एकर परिसर, ८३४ इमारती, ३० हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.
मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात असते (CM Eknath Shinde)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सोलापूरच्या भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले होते. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात असते. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत”
फिर एक बार मोदी सरकार और चारशे पार (CM Eknath Shinde)
अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं, पण आज मंदिर पूर्ण होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे हाऊस होत आहेत. संपूर्ण देशात रे हाऊस व्हायला हवं असे मोदींजींनी सांगितले होते. ८० करोड लोकांना मोफत अन्न मोदीजी देत आहेत. देशातल्या लोकांनी गॅरंटी दिलीय फिर एक बार मोदी सरकार और चारशे पार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.




