
नगर : आज देशभर व्हेलेंटाइन डे (Valentine Day) साजरा करत आहे. याच प्रेमाच्या दिवसाचं औचित्य साधत गायिका आर्या आंबेकरचं (Arya Ambekar) एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ‘चोरू चोरून’ हे गाणं आर्याच्या सुमधूर आवाजात प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘फतवा’ सिनेमातील ‘दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत यांचं ‘चोरू चोरून’ चे फिमेल वर्जन गाणं आता प्रदर्शित झालं आहे.
आर्याच्या आवाजातील गाणं आता सोशल मीडियावर व्हायरल (Choru Chorun Song)
‘चोरू चोरून’ गाण्याचं संगीत दिग्दर्शन संजीव – दर्शन यांनी केले असून आकर्षक गीतरचना डॉ. विनायक पवार यांनी लिहिली आहे. या गाण्यात अभिनेता प्रतिक गौतम आणि अभिनेत्री श्रद्धा भगत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्याच्या आवाजातील हे गाणं आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यावेळेस हे गाणं प्रदर्शित झालं होत. तेव्हा करोडो चाहत्यांनी यावर व्हिडीओ स्वरुपात रील्स बनवल्या होत्या.
अभिनेता प्रतिक गौतम काय म्हणाला ? (Choru Chorun Song)
अभिनेता प्रतिक गौतम या गाण्याविषयी सांगितले की, ‘फतवा चित्रपटातून मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. तसंच मी त्यात मुख्य अभिनेताही होतो. विशेष म्हणजे ‘चोरू चोरून’ गाण्यातील ‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या शब्दामुळे हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतलं. भारतातचं नाही तर अगदी जागतिक स्तरावर मला या गाण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. परदेशातून रील्स, मीम्स, कमेंट्सचा जणू पाऊस पडत होता.’ या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.विशेष बाब म्हणजे हे गाणं आर्याने गायलं आहे. आर्याने खूप गोड गायलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्धसुद्धा सुरेख केलं आहे. या गाण्याला संजीव – दर्शन यांचं संगीत आहे. सर्व कानसेन रसिक प्रेक्षकांना हे गाणं अगदी भावेल याची मला खात्री आहे. तसंच मी भविष्यात उत्तमोत्तम चित्रपट आणि नवी गाणी आणण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन यावेळी प्रतिकने दिले.