
China : नगर : चीनमध्ये (China) लहान मुलांमध्ये श्वसनविकारांची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर आराेग उपसंचालकांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात सध्या सारीचे रुग्ण (patient) आढळलेले नाही. मात्र, जिल्ह्यात काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आराेग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
चीनमध्ये लहान मुलांना होणार्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार आणि जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा पातळीवरून आता आरोग्य विभाग लहान मुलांना होणार्या श्वसनविकारावर लक्ष ठेवून आहेत.
यासाठी महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांनी सारीबाबतची माहिती घेऊन नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाटांची तयारी, ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, ऑक्सिजन प्लांट, सिलेंडर कार्यान्वित आहेत, की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश दिला आहे.




