Child marriage : अकोलेत बालविवाह जनजागृती सायकल रॅलीचे स्वागत

    125

    Child marriage : अकोले: तालुक्यातील बालविवाहांचे (Child marriage) प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (Child Marriage Prevention Officer) म्हणून कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकांची व लग्नातील घटकांची बैठक घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू, अशी ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे (Dr Kiran Lahamate) यांनी दिली.

    जनजागृती अभियानाचे आयोजन (Child marriage)


    स्नेहालय युवा निर्माण, उडान प्रकल्प व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्यावतीने अकोले येथे बालविवाह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. अहमदनगरहून आलेल्या बालविवाह जनजागृती सायकल रॅलीचे अकोलेत स्वागत करण्यात आले. उडान प्रकल्प अंतर्गत अकोले शहरातून बालविवाह जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. बस स्थानकामध्ये नागरिकांत बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अगस्ति महाविद्यालय येथे पथनाट्य सादर करण्यात आले.

    बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाचे महत्व सांगितले (Child marriage)

    बालविवाहाचे तोटे तरुणींना सांगून ज्याठिकाणी बालविवाह होत असेल त्याठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले. या पथनाट्यसही उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाचे महत्व सांगितले. 


    यावेळी डॉ. संदीप कडलग, अकोले तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष वसंत मनकर, शिवसेना नेते महेश नवले, साऊ महिला संस्थेच्या संयोजिका प्रतिभा कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास सोनवणे, रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष सुनील नवले, सायकल असोसिएशनचे काळे, अमित वैद्य, उडान प्रकल्प समन्वयक प्रदीप कदम, विकास सुतार, रोटरी क्लब अहमदनगरचे नितीन थाडे, असुलता थाडे आदी उपस्थित होते. या सायकल रॅलीमध्ये ३५ मुली व २५ मुले यांनी सहभाग घेतलेला आहे. या सर्वांची राहण्याची व जेवणाची सोय रोटरी क्लबने केली. सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले. रोटरीचे सचिव विद्याचंद्र सातपुते यांनी आभार  मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here